मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दोन दिवसांपूर्वीच राणे आणि ठाकरे समर्थक राजकोट किल्यावर भिडले होते. त्यानंतर आज (३० ऑगस्ट) खासदार संजय राऊत किल्ल्यावर पाहणी करण्यासाठी पोहोचले. यावेळी कार्यकर्ते आणि पत्रकारांना रोखण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झाल्याचं पाहायला मिळालं.