पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पालघरमध्ये वाढवणं बंदराचं भूमिपूजन पार पडलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढवण बंदराच्या यशाचं श्रेय मोदी सरकारला दिलं आहे. तसंच वाढवण बंदरामुळे पंतप्रधानांचं नाव पुढील २०० वर्षे इतिहासात कोरलं जाईल, असेही गौरवोद्गार फडणवीसांनी काढले.