Kid Did Not Want to Leave Kidnapper Viral Video: राजस्थानच्या जयपूरमध्ये स्थानिक पोलिसांनी मोठ्या हिकमतीनं एका गुन्ह्याचा छडा लावला. एका चिमुकल्याची पोलिसांनी अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली. त्याला त्याच्या आई-वडिलांकडेही सोपवलं. पण पुढे घडलेल्या प्रकारामुळे पोलीसही चक्रावले. या मुलाला अपहरणकर्त्यापासून सोडवल्यामुळे त्याला आनंद होण्याऐवजी ते मूल ओक्साबोक्शी रडू लागलं. अपहरणकर्त्याकडेच राहण्याचा हट्ट धरू लागलं.