https://youtu.be/yJWEgQiAfGk?si=4GZVck1_VTPG8O5z
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांसाठी १३ सप्टेंबर रोजी काढण्यात येणारी सोडत अखेर पुढे ढकलण्यात आली आहे. सोडतीतील अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेसाठी किमान ४५ दिवसांचा कालावधी देणे बंधनकारक असताना विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा धसका घेत मुंबई मंडळाने या प्रक्रियेसाठी केवळ २६ दिवसांचा कालावधी दिला होता असा दावा वजा आरोप करण्यात येत होता. मात्र आता म्हाडाच्या घराच्या सोडतीसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सोडतीची व अर्जाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहेच पण त्याबरोबरीने घराच्या किमती सुद्धा कमी करण्यात आल्या आहेत. हे नवे निर्णय नेमके काय हे आजच्या व्हिडीओमध्ये आपण जाणून घेणार आहोत.