सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघडीच्या वतीने आज महायुती सरकारच्या विरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात येत आहे. ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन होत आहे.या आंदोलनात शरद पवार, उद्धव ठाकरे तसेच महाविकास आघाडीचे नेते सहभागी झाले आहेत.