‘लोकसत्ता’च्या ‘नवे क्षितिज’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी पार पडले. प्रकाशन सोहळ्यानंतर झालेल्या प्रश्नोत्तर सत्रात फडणवीस यांनी नगर नियोजनाच्या संकल्पना, मुंबई आणि एमएमआरचा पायाभूत सुविधांसह विकास, नवनगरे उभारताना पिण्याचे पाणी, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन आदी प्रश्नांची हाताळणी याबाबत मनमोकळेपणे भाष्य केले.