एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने आंदोलनाची घोषणा केली होती. मुख्यमंत्री यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढला पाहिजे होता मात्र अद्याप काढला नाही त्यामुळे कर्मचारी उद्या आंदोलन करण्यावर ठाम आहेत.उद्यापासून एसटी कर्मचारी आंदोलन करणार आहेत. त्यामुळे एन गणेशोत्सवात वाहतुकीत खंड पडल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार हे सरकार राहणार आहे अशी माहिती एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली.