कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने एसटी कामगार संयुक्त कृती समितीने मंगळवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे राज्यातील २५१ आगारांपैकी ३५ आगारे पूर्णतः बंद झाली आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.