मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकारण प्रचंड तापले होते. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा संग्राम सुरू झाला. महाविकास आघाडीने महायुतीविरोधात जोडे मारो आंदोलनही केले. या आंदोलनावर टीका करताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसबाबत उद्धव ठाकरे यांना सवाल करताना महाराजांनी सूरत लुटली नव्हती असं वक्तव्य केलं होतं. मालवणमधील पुतळ्याचा वाद राहिला एकीकडे आणि मग या वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीसांवरच प्रचंड टीका झाली. केवळ विरोधकच नव्हे तर फडणवीसांच्या पक्षातील मंडळींकडून सुद्धा या विधानाचा विरोध केला जातोय. याच पार्श्वभूमीवर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं याच मुद्द्यावरील एक जुनं भाषण तुफान व्हायरल होत आहे. फडणवीस व मोदी यांच्या विधानातील विरोधाभास पाहण्यासाठी आधी हे दोन्ही नेते काय म्हणाले हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया.