Pune Crime News: पुण्यात किरकोळ कारणावरून खुनाचे प्रकार वाढले आहे. हडपसर येथे मोबाइल हॉटस्पॉट न दिल्याने चौघांनी रात्री शतपावली करण्यासाठी गेलेल्या एका मॅनेजरची हत्या केली. वासुदेव कुलकर्णी (वय ४७, हडपसर) असे खून झालेल्यांचे नाव आहे. या प्रकरणी कुलकर्णी यांचे भाऊ विनायक (वय ५२) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर मयूर भोसले (वय २० रा. वेताळबाबा वसाहत , हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. इतर तिघांची नावे अद्यापही समजू शकली नाही.