भाजपाचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी भाजपाला धक्का देत शरद पवार गटात प्रवेश केला आहे. मंगळवारी (३ सप्टेंबर) शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत समरजितसिंह यांचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी शरद पवार बोलताना म्हणाले की, विधानसभेत गेल्यानंतर ते नुसते आमदार राहणार नाहीत, तर त्यांना हवं ते काम करण्याची संधीही देणार, असा शब्द पवारांनी दिला.