छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तविकपणे सुरत लुटलं नव्हतं. मात्र, सुरत लुटल्याचा खोटा इतिहास काँग्रेसने आपल्याला शिकवला, असं वक्तव्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केलं होतं. त्यांच्या या विधानावर अनेकांनी टीका केली.देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानावर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.