छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरचा पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे हा फरार होता. अखेर त्याला ४ सप्टेंबरच्या रात्री अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सापळा रचत कल्याण येथील त्याच्या राहत्या घरातून जयदीपला अटक केली आहे. सध्या सिंधुदुर्ग येथे घेऊन जाण्यात आलं असून न्यायालयात हजर केलं जाणार आहे.