गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबई ठाण्यातील चाकरमान्यांची मोठी गर्दी आज दिवा रेल्वे स्थानकात झाली होती. सकाळी ६.२०ची दिवा सावंतवाडी एक्सप्रेस कोकणवासीयांनी भरली होती. ट्रेनमध्ये बसण्यासाठी जागा मिळावी यासाठी काल रात्रीपासून कोकणवासीय दिवा रेल्वे स्थानकात होते. मात्र तरीही बसण्यासाठी जागा मिळाली नसल्याने प्रवाशांना उभं राहून प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाकडून जादा गाड्या सोडूनही गर्दीतून प्रवास करावा लागत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.