बदलापूर रेल्वे स्थानकात झालेल्या गोळीबार प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. घटनेबाबत रेल्वे डीसीपी मनोज पाटील यांनी माहिती दिली की, चौघे जण होते पैशाच्या वाटपावरून त्यांच्यात वाद झाला व त्यातून फायरिंगची घटना घडली, चौघेही आरोपी रेकॉर्डवरील आरोपी आहेत.गोळीबार करणाऱ्या विकास पगारे नावाच्या आरोपीला ताब्यात घेतलं त्याच्यावर दोन गुन्हे टिटवाळा पोलीस ठाणे , दोन गुन्हे उल्हासनगर मध्ये दाखल आहेत. पैशांच्या देवाण-घेवाण आणि पैशांचा वाटपावरून अचानक त्यांच्यात वाद झाला आणि त्या वादाचे परिणाम गोळीबारात झालं दोन राऊंड फायर करण्यात आले असून त्याने बंदूक कुठून आणली याचा तपास सुरू आहे.