Did Mohan Bhagwat Targeted PM Narendra Modi? – पूर्व सीमा प्रतिष्ठानच्या वतीने संघाचे स्वयंसेवक आणि प्रचारक कै. शंकर दिनकर तथा भय्याजी काणे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात डाॅ. भागवत बोलत होते.‘मी देव झालो, असे स्वत: म्हणू नये. तुमच्यातील देवत्व लोकांना ठरवू द्या,’ अशा शब्दांत येथे आयोजित कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गुरुवारी उपस्थितांचे ‘बौद्धिक’ घेतले. ‘क्षणभर चमकणाऱ्या विजेसारखे कधी होऊ नये. चमकणे डोक्यात जाते. त्यामुळे वीज होऊन चमकण्यापेक्षा पणती होऊन तेवत, जळत राहावे,’ असा ‘सल्ला’ही त्यांनी दिला.