छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली नव्हती, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यावर विरोधकांकडून परखड शब्दांत टीका केली जात आहे. शिवाजी महाराजांनी दोन वेळा सूरत लुटल्याचं प्रत्युत्तर विरोधकांकडून देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप होत असताना आज गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे.