मुंबईत एकीकडे गणरायाच्या आगमनाचा जल्लोष सुरू असताना दुसरीकडे मुलुंडचा राजा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली आहे. मुलुंडमध्ये शनिवारी पहाटे एका भरधाव बिएमडब्लूने शिडीवर चढून बॅनर लावणाऱ्या दोन गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना उडवले. यात प्रीतम थोरात या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला असून प्रसाद पाटील हा कार्यकर्ता गंभीर जखमी आहे. तर या प्रकरणी काही तासातच पळून गेलेल्या शक्ती अलगच्या गाडीचा शोध पोलिसांनी घेतला. मुलुंड कॉलनी परिसरात जिथे शक्ती राहतो तिथून पोलिसांनी बीएमडबल्यू कार ताब्यात घेतली. पण शक्ती हा दुचाकी घेऊन फरार झाला होता. आठ पथकांच्या मदतीने अखेर पोलिसांनी खारघर येथून शक्तीला अटक केली आहे. त्याची मेडिकल तपासणी आणि चौकशी सध्या सुरू आहे.