केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर आहेत. रविवारी (९ सप्टेंबर) एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी किमान घरात तरी मातृभाषेत बोला असं आवाहन केलं. तसंच नव्या शैक्षणिक धोरणात प्राथमिक शिक्षण मातृभाषेत केलं जाणार, असंही यावेळी अमित शाह यांनी अधोरेखित केलं.