दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी बोलताना त्यांनी, “बॉम्बे नको मुंबई हवी, अशी मागणी झाली, तेव्हा मी देखील ही मागणी करणाऱ्यांमध्ये होतो”, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.