राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्हय़ाचे पालकमंत्री अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. शिवाजीनगर येथील निवासस्थान येथून अजित पवार हे सर्किट हाऊसच्या दिशेने जात होते. त्यावेळी संचेती हॉस्पिटलच्या पुलाखाली एका दुचाकी स्वाराचा आणि रिक्षाचा अपघात झाला. हा अपघात बघताच अजित पवार यांनी ताफा थांबवत अपघातग्रस्त व्यक्तीची विचारपूस करीत ताफ्यातील अँब्युलन्समधील डॉक्टरांना ताबडतोब उपचार करण्यासाठी सांगितले.