भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या नावे असलेल्या ऑडी गाडीने नागपूरमध्ये पाच वाहनांना धडक दिली. त्यावर आता विरोधकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत थेट गृहमंत्रालय आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट दाखवलं आहे. हे कृत्य जर विरोधी पक्षातील नेत्याच्या मुलाकडून झालं असतं तर फडणवीस आणि बावनकुळेंच्या फौजा तुटून पडल्या असत्या, अशीही टीका संजय राऊतांनी केली आहे.