आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार हे तयारीला लागले आहेत. स्वाभीमानी यात्रेची त्यांनी घोषणा केली आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणा केली असता त्यांनी आता सगळ्यांनाच आमदार
व्हायचं आहे, असं मिश्कील भाष्य केलं. जो तो आपापल्यापरिने संघटना वाढवण्याचा प्रयत्न करतो. अजून एक तिसरी आघाडी पुढे आलेली आहे. आता चौथी आघाडी येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असंही सूचक विधान अजित पवारांनी केलं आहे.