नागपूरच्या सीताबर्डी भागात झालेल्या अपघातावरून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत यांचं नाव या संपूर्ण प्रकरणात आहे. दरम्यान अपघात झाल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न झाला, गाडीची नंबर प्लेट काढण्यात आली, एफआयआरमध्ये संकेत बावनकुळे यांचं नाव नाही या सगळ्या मुद्द्यांवरून विरोधकांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना घेरलं आहे. या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर बावनकुळे यांनी मंगळवारी (१० सप्टेंबर) पुण्यात स्पष्टीकरण दिलं आहे.