नागपूरच्या ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.. रविवारी मध्यरात्रीनंतर अनेक वाहनांना धडक देणाऱ्या ऑडी कारमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत चालकाच्या शेजारी बसून होता, असे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. नागपूरमध्ये घडलेल्या या घटनेवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.