नागपूरमधील हिट अँड रन प्रकरण आता विरोधकांनी चांगलंच लावून धरलं आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या आज नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्या आणि त्यांनी संपूर्ण प्रकरणाचा तपशील जाणून घेतला. तसंच पाोलिसांनी जप्त केलेल्या संकेत बावनकुळे यांच्या गाडीची पाहणी करताना त्यांनी गायब झालेली नंबर प्लेटही दाखवली.