काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणाबद्दल केलेल्या विधानामुळे नवा वादंग निर्माण झाला आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील राहुल गांधींच्या विधानाचा निषेध केला आहे. काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा समोर आलेला आहे. काँग्रेसने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना दोनदा दगा देऊन पराभूत केलं होतं. जे बाबासाहेबांना दगा देऊ शकतात ते आरक्षणाला कधीही दगा देऊ शकतात, अशी टीका शिंदे यांनी केली आहे.