पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (११ सप्टेंबर) रात्री सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी चंद्रचूड यांच्या घरातील गणपतीचं दर्शन घेतलं आणि आरतीही केली. या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या भेटीवर प्रश्न उपस्थित केला आहे.