पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत पदकं जिंकून भारतीय खेळाडू मायदेशी परतले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (१२ सप्टेंबर) खेळाडूंची भेट घेतली, त्यांच्याशी गप्पा मारल्या व पुढील कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मोदी भारताचा भालाफेकपटू नवदीप सिंह याच्याबरोबर हास्यविनोद करताना दिसले. नवदीपने यावेळी मोदी यांना त्याची टोपी भेट म्हणून दिली. तेव्हा पंतप्रधान मोदींनी केलेल्या एका कृतीचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.