केंद्रिय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकलने प्रवास केला. भांडुपमधील मराठा गणेशोत्सव मित्र मंडळाच्या गणपती दर्शनाला ते आले होते. यावेळी अश्विनी वैष्णव यांनी भांडुपमधील प्रसिद्ध असा ‘भाऊ’चा वडापावचादेखील आस्वाद घेतला. तेव्हा वडापावचं बिल देताना डिजिटल पेमेंट नाही का? असा प्रश्न त्यांनी विक्रेत्याला
केला. तसंच येत्या काळात मुंबईच्या लोकलमध्ये वाढ देखील करणार असल्याचं ते म्हणाले..