CM Ladki Bahin Yojana Scheme: लाडकी बहीण योजनेत २१ ते ४५ वयोगटातील दुर्बल घटातून येणाऱ्या महिलांना प्रति महिना दीड हजार रुपयांची मदत दिली जात आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरले जात आहेत. या संधीचा फायदा घेऊन कन्नड तालुक्यातील १२ पुरुषांनी महिलांचे फोटो वापरून अर्ज भरले आहेत. या प्रकारानंतर आता या १२ भावांवर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. ‘लाडकी बहीण’ योजनेत सुमारे २ कोटी लाभार्थींना दरमहा दीड हजार रुपये गृहीत धरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात वर्षाला ४६ हजार कोटींची तरतूद केली आहे.