धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे आज शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्याला शरद पवार यांनी हजेरी लावली आहे. या शेतकरी मेळाव्यात केलेल्या भाषणात शरद पवार यांनी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला. “बहिणींना १५०० रुपये देण्यापेक्षा त्यांचे संरक्षण करण्याची खऱ्या अर्थानं आज गरज आहे”, असं शरद पवार म्हणाले.