विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वच पक्षात श्रेयवादाची चढाओढ लागलीय. आज नांदेडच्या तामसा येथे “लाडक्या बहिणींचा देवा भाऊ” या उपक्रमाच्या अंतर्गत साडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दोन हजार साड्या वाटप करण्याचे आयोजकांनी सांगितले होते.परंतु महिलांची संख्या जास्त झाली. साड्या कमी पडल्या आणि याठिकाणी साड्या घेण्यासाठी महिलांची एकच झुंबड उडाली. अनेक महिला साड्या न घेताच परत निघून गेल्या.