मराठा आरक्षणासंदर्भातील सगळ्या मागण्या अद्याप शासनदरबारी मान्य न झाल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. आज मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसणार असून त्याआधी आज सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. नाराजी भरून काढायची असेल तर आरक्षण द्यावं लागेल. नाही दिलं तर पुढे माझ्या आणि मराठा समाजाच्या नावाने तक्रार करायची नाही. मराठा समाज ऐकून घेणार नाही, असं जरांगे म्हणाले.