जम्मू आणि काश्मीरमध्ये तब्बल १० वर्षांनी आणि अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर प्रथमच विधानसभा निवडणूक होत आहे. चार महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणुका शांततेत पार पडल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठीही शांततेत मतदान होण्याची अपेक्षा आहे. तब्बल साडेतीन दशकांच्या कालावधीत यंदा प्रथमच काश्मीर खोऱ्यात कोणत्याही भीतीविना प्रचार सभा पार पडल्या. त्यामध्ये जनतेचा उत्साही सहभागही दिसून आला.