मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारला पुन्हा इशारा दिला आहे. सर्व मागण्यांची अंमलबजावणी करा, या भूमिकेवर मनोज जरांगे ठाम आहेत. तसंच राजकीय करिअर उद्धवस्त करून टाकेन, असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे.