आज (१८ सप्टेंबर) जगापूर येथे मनाठा सर्कलमध्ये भाजपाकडून महिलांना साड्या वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मनाठा सर्कल येथून मोठ्या संख्येने महिला आल्या होत्या. साड्या घेण्यासाठी महिलांची एकच झुंबड उडाली. मात्र काही महिलांना साडी न घेताच माघारी परतावे लागले आहे. एवढ्या लांबून येऊन सुद्धा साड्या न मिळाल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे.