एक देश एक निवडणूक हा विषय क्लिष्ट आहे. एका वेळी निवडणूक घेतली तर ताण येऊ शकतो, असं मत घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी वक्त केलं आहे. भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीने एक देश, एक निवडणूक हा कार्यक्रम राबविण्यासंदर्भातला अहवाल मार्च २०२४ रोजी केंद्राला सोपविला होता. त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे. यावर आता संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.