गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात चर्चा असलेल्या ‘एक देश, एक निवडणूक’ धोरणाबाबत केंद्र सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीने एक देश, एक निवडणूक हा कार्यक्रम राबविण्यासंदर्भातील अहवाल मार्च २०२४ रोजी केंद्राला सोपविला होता. या अहवालाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निडणुका होऊ घातल्या आहेत. अशातच एक देश एक निवडणुकीचा हा प्रस्ताव किती फायदेशीर ठरणार? किंवा त्याचा काही परिणाम होणार का? खरंच एक देश एक निवडणूक ही संकल्पना राबवणं शक्य आहे का? त्यावर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया उमटल्या हे व्हिडीओमधून सविस्तर जाणून घेऊ या.