राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत असली, तरी काही नेत्यांकडून तिसऱ्या आघाडीचे प्रयत्नही सुरु आहेत. त्यासंदर्भात आज पुण्यात बैठकही पार पडली. या बैठकीला माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू यांनी हजेरी लावली होती. आता संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी त्यांच्या ‘परिवर्तन महाशक्ती’ या आघाडीची घोषणा केली आहे.