पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमरावती टेक्सटाईल पार्कचं ई-भूमिपूजन झाले. अमरावती एमआयडीसी या ठिकाणी ई कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजप खासदार अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा व इतर मान्यवर आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी खासदार नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळाले.