काही नेते आपल्या मुला-मुलींना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. अशा नेत्यांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टीका केली आहे. नितीन गडकरी हे घराणेशाहीबाबत बोलताना म्हणाले,”नेते आधी आपल्या मुलासाठी, मुलीसाठी आणि पत्नीला तिकीट मागतात. मतदार या लोकांना मतदान करतात म्हणून ते तिकीट मागतात. ज्या दिवशी मतदार घराणेशाहीतून आलेल्यांना मतदान करणार नाहीत, त्यादिवशी एका मिनिटात सर्व सरळ होतील.”