मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचलेली असतानाच मुंबई विद्यापीठ प्रशासनाने ही निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. एका वर्षात दुसऱ्यांदा ही निवडणूक स्थगित झाल्याने विद्यार्थी संघटनांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यावर आता खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया देत शिंदे सरकार डरपोक असल्याचं म्हटलं आहे.