पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज पार पडला. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार तथा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताच कार्यर्त्यांनी जोरजोरात घोषणाबाजी सुरू केली. फडणीस आणि नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना हाताने इशारा करत घोषणा थांबण्यास सांगितल्या. मात्र तरी देखील घोषणाबाजी सुरुच होती.