वरळीत शनिवारी (२१ सप्टेंबर) मनसेकडून वरळी व्हिजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टाऊन प्लानिंगपासून पुतळ्याच्या राजकरणापर्यंत या विषयांवर आपलं परखड मत व्यक्त केलं. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा मुद्दा काढून त्यांनी सिंधुदुर्गात घडलेल्या घटनेचा दाखलाही दिला.