आमची ताकद काहीच नाही, असं समजू नये. आरपीआय छोटा पक्ष असला तरी गाव पातळीपर्यंत आमची बांधणी आहे. कार्यकर्त्यांच्या ताकदीवर मी उभा आहे. त्यामुळे आरपीआयला डावलून चालणार नाही.आरपीआयची मतं आपल्याला मिळवायची आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा गंभीरपणे विचार करावा, असा विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.