आम आदमी पक्षाच्यावतीने ‘जनता की अदालत’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या भाषणा दरम्यान पक्षाचं चिन्ह असलेली झाडू हातात घेत आगामी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. दिल्लीची विधानसभा निवडणूक आपली अग्निपरीक्षा आहे, असं ते यावेळी म्हणाले.