बदलापूर येथील नामांकित शाळेतील दोन चिमुरड्या विद्यार्थींनीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी (दि. २३ सप्टेंबर) पोलीस चकमकीत मृत्यू झाला. मुंब्रा बायपासजवळ पोलीस वाहनातच गोळाबाराच्या घटनेत अक्षय शिंदे ठार झाला. यावेळी ज्यांच्या गोळीमुळे अक्षयचा मृत्यू झाला, त्या पोलीस अधिकाऱ्याने यापूर्वी प्रसिद्ध चकमकफेम अधिकारी प्रदीप शर्मांबरोबर काम केले होते, अशी माहिती समोर येत आहे.