बदलापूर येथील एका शाळेतील दोन चिमुरड्या विद्यार्थींनीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी (दि. २३ सप्टेंबर) पोलीस चकमकीत मृत्यू झाला. आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधक करत आहेत. तसेच या प्रकरणी विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास देखील सुरुवात केली आहे.