बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील याबाबत भाष्य केलं आहे. तसंच प्रकरणातील दोन गोष्टींबद्दल खुलासा करण्याची मागणीही त्यांनी सरकारकडे केली आहे.